नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट हळूवारपणे कमी-कमी होत चालली आहे. मात्र भविष्यातील कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. यासाठी कोविड आजारासह लसीकरण साक्षरता महत्वाची असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.या वेळी डॉ. इटनकर यांच्या हस्ते कोविड-19 लसीकरण जनजागृती करणार्या एलईडी मोबाईल डिजीटल व्हॅनचे उद्घाटन झाले.
महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय व शहरी आरोग्य अभियानच्या माध्यमातून नांदेड शहर, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय अंतर्गत जिल्ह्यातील वेगवेगळया तालुक्यांच्या ठिकाणी कोरोना लसीकरण विषयक जनजागृती विषयक माहिती चित्ररथाव्दारे दिली दिली जाणार आहे. या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते
गुरुवार दि. 6 मे रोजी झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिह परदेशी, जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांची उपस्थिती होती.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर म्हणाले,की लोकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. लसीकरणाचे होणारे फ ायदे म्हणजे भविष्यात कोरोना झाला,तरी त्याचा आरोग्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे आपण सामान्यपणे हा आजार थोपवू शकतो, इतकी क्षमता शासनाने निर्माण केलेल्या लसीमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी डॉ. इटनकर यांनी केले.
डॉ. निळंकठ भोसीकर म्हणाले, की कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी लसीकरण करणे यावर आरोग्य प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी लोकांमध्ये लसीकरणाचे महत्च याबाबत जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी लसीकरणाचा प्रसार केला जाणार असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…