नांदेड

भीम महोत्सवात पंजाबी गायिका गिन्नी माही यांच्या गीतांचे आयोजन;मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – बापूराव गजभारे

नांदेड,बातमी:- बी.आर. आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने सर्वपक्षीय भीम महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीची आंबेडकरी गायिका गिन्नी माही (पंजाब) यांच्या भीमगितांचा कार्यक्रम तसेच कृष्णाई पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6.00 वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे होणार असून या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक बापूराव गजभारे व स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी केले.

या सोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री, अशोकराव चव्हाण हे निमंत्रित असून माजी खासदार पी.आर.पी. चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा यांची उपस्थिती राहणार आहे. या भीम महोत्सव सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, खासदार हेमंत पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, आ.अमरनाथ राजुरकर, माजी खा.सुभाष वानखेडे, पी.आर.पी. चे कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.बालाजीराव कल्याणकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ.वसंतराव चव्हाण, आ.जितेश अंतापुरकर, महापौर जयश्रीताई पावडे यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती बापूराव गजभारे व पंढरीनाथ बोकारे यांनी दिली.
यावेळी कृष्णाई पुरस्काराचेही वितरण केले जाणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार संत बाबा बलविंदरसिंघजी (कारसेवावाले), राज्यस्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने (नागपूर), जिल्हास्तरीय पुरस्कार प्रल्हाद कांबळे व छायाचित्रकार पुरस्कार ज्ञानेश्वर सुनेगावकर यांना या महोत्सवात दिला जाणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago