Categories: नांदेड

गुरुद्वारा दर्शनासाठी प्रवेशद्वार खुले; 56 दिवसानंतर झोन मुक्त

नांदेड, बातमी24ः-जिल्हा व शहर प्रशासनातर्फे अखेर 56 दिवसानंतर गुरुद्वारा तख्त सचखंड हजूर साहेब परिसर व भोवतालचा कन्टेनमेंट झोन आणि गुरुद्वारा श्री लंगर साहेब येथील झोन हटवण्यात आला आहे. जवळपास दोन महिन्यानंतर गुरुव्दारा दर्शनासाठी प्रवेशव्दार खुले होणार आहे.

शनिवार दि. 27 जून रोजी नांदेड शहर महानगर पालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी कंटेन्मेंट झोन हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आदेश काढण्यात आले.आदेश प्राप्त झाल्यानंतर गुरुद्वारा गेट नंबर एकचा मुख्य प्रवेशद्वार परिसर खुले झाले. भाविकांना दर्शनासाठी मार्ग मोकळा झाला.

सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक डॉ. विजय मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी गुरुद्वारा परिसर येथे भेट देऊन वरिष्ठ सहायक अधीक्षक रणजीतसिंघ चिरागिया यांच्याशी चर्चा केली. या प्रसंगी श्री चिरागिया यांचे सत्कार करून त्यांना प्रशासकीय अधिकार्‍यांनी गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाचे आभार व्यक्त करणारे एक मानपत्र प्रदान केले. वरील सन्मानपत्र अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास यांचे नावे असून बोर्डाचे आभार मानलेे.

प्रशासनाने गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले आणि संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या नावाने गुरुद्वारा लंगरसाहेब तर्फे देण्यात आलेल्या सेवांचा उल्लेख करून आभार मानले. गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मिनहास, उपाध्यक्ष स. गुरविंदरसिंघ बावा, सचिव स. रवीन्द्र सिंघ बुंगई, बोर्डाचे सर्व सदस्य, अधीक्षक स. गुरविंदर सिंघ वाधवा यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago