नांदेड,बातमी24:- कॉंग्रेसचे लिंबगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी आमदार,खासदार व मंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कारभारातील वाढत चाललेल्या लुडबुडीवर प्रश्नचिन्ह उभे करत,जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अधिकारावर गदा आणणारी बाब असल्याच्या गंभीर मुद्याला हात घालण्याचे धारिष्ट दाखविले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अबूलगेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले,की जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात निवडून आलेल्या सदस्यापेक्षा आमदार,खासदार व मंत्री हे अधिक हस्तक्षेप करत असून कुणी बीडीओ रजेवर गेला,तर त्या जागेवर प्रभारी नेमणूक द्यायची असेल तर आमदार,खासदार व मंत्री शिफारस करत असतात.यासाठी ते जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सभापती यांना विश्वासात घेत नाहीत.
जिल्हा परिषदमधील अधिकारी बदल्या असो,की प्रतिनियुक्त्या बाबत लुडबुस ही बाहेरच्या लोकप्रतिनिधींची अधिक वाढत आहे, ही आक्षेपार्ह बाब असल्याचे श्री.धनगे यांचे म्हणणे आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…