नांदेड, बातमी24ः- इतवारा भागातील अवैध व्यवसायाच्या वर्चस्वावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात लाठया-काठया, लोखंडी रॉड व तलवारीचा वापर केला गेला. यात हाणामारी एक जण गंभीर जखमी असून त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.ही घटना सोमवार दि. 6 जुलै रोजी दुपारी घडली.
इतवारा भागात शांतीनगर भागात दारु, मटका, गुटखा असे अवैध व्यवसाय चालतात. या अवैध व्यवसायावरून दोन गटात कायम खटके उडत असत. या वादा-वादीचे पर्यावसन सोमवारी पैलवान टी हाऊससमोर हाणामारीत झाले. दोन्ही गटातील मंडळी समोरा-समोर भिडले. यात काठया-लाठया, तलवारी उपसल्या गेल्या. दोन्ही बाजूंनी बराच वेळ दगडफे क करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरवाडे यांनी फ ौजफ ाटा घेऊन दाखल झाल्यानंतर हाणामारी करणारे फ रार झाले. या हाणामारीत गोविंद कांबळे नामक तरूण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले, असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी गुन्हा नोंद होऊ शकला नव्हता. असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…