Categories: नांदेड

नेतृत्व निर्माण केले पाहिजे:शरद पवार;कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सव सोहळा

नांदेड, विशेष वृत्त;-समाजकारण असो की राजकारण यात जाण असलेल्या नव्या पिढीला समावून घेतलं पाहिजे,यासाठी जिल्हा परिषद या उधाचा महाराष्ट्र घडविणाऱ्या शाळा आहेत. येथून येणाऱ्या कर्तुत्वान पिढीला राजकारणात संधी दिली पाहिजे, यातूनच कमलकिशोर कदम व आर आर पाटील सारखे नेते महाराष्ट्राला मिळाले,असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले,ते कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड येथे बोलत होते.

माजी शिक्षणमंत्री तथा एमजीएम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळा नांदेड येथे शनिवार दि.14 मे रोजी पार पडला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील,समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, राज्यसभा फौजिया खान, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,खासदार हेमंत पाटील,यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार,खासदार यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,की कमलकिशोर कदम व माझा संपर्क सतरच्या दशकात आला. शिक्षण संस्था कशी चालविली पाहिजे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कलमबाबू हे असून संस्था काढण्यासाठी 20।लाख रुपये लागणार होते,त्यासाठी पुणे येथील महाराष्ट्र बँकेत स्वतः गेलो होतो. अशी आठवण सांगत तेव्हापासून कमलकिशोर कदम यांनी मागे वळून पाहिले नाही.आज एमजीएम संस्थेचे राज्यासह देशभर शिक्षणाचे विस्तारलेले जाळे पासून मनस्वी आनंद होतो.

काम करण्याची प्रामाणिक हातोटी त्यांच्या अंगी होती,शिवाय राजकारणातही सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. संस्था कशी चालवावी,गुणवंत विद्यार्थी यास कसा वाव दिला जावा,हे त्यांच्याकडून शिकाय सारखे आहे.

माझ्या सार्वजनिक जीवनाला साथ वर्षे झाले असून त्यातील 55 वर्षे हे संसदीय व विधिमंडल कार्यात गेले,लोकांनी सेवा करण्याची संधी दिली,हे विशेषतः म्हणावे लागेल. समाजकारण असो,की राजकारण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींना वाव मिळतो,असाच प्रसंग सांगताना पवार म्हणाले,मी मी सांगली महाविद्यालय कार्यक्रमात गेलो असता,एक कॉलेज मुलगा माझ्यासमोर भाषण करत होता, त्यावेळी त्यास मी बोलावून घेतलं,त्यास विचार तुला काय व्हायच आहे,तो म्हणाला नोकरी मिळवायची आहे,त्यास मी म्हणालो,तू समाजकरणात ये,त्यानंतर हा मुलगा सर्वात तरुण वयात जिल्हा परिषद सदस्य झाला.कालातराने आमदार,ग्रामविकासमंत्री,गृहमंत्री व उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचला, त्यांचे नाव आर आर पाटील होत, अस सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.तशीच धडपड मला कमलकिशोर कदम यांच्या कार्याकडे पाहून बघायला मिळते,असे पवार यांनी आवर्जून सांगितले.

कमलकिशोर कदम म्हणाले,की माझ्या जीवनात शरद पवार व माझे बंधू बाबुराव कदम यांचे मोलाचे स्थान आहे.पन्नास रूपये घेऊन संस्था काढायला निघालेल्या माणसाला पवार साहेब यांनी 20 लाख रुपयांची गॅरंटी दिली,त्यामुळे हा प्रवास इतपर्यंत पोहचू शकला. पवार साहेब माझ्या कुटूंबाचा मोठा वाटा या उभारणीत आहे. माझे बंधू बाबुराव कदम म्हणतात आता आपण थकलो आहोत,थांबलं पाहिजे,मी त्यांना पवार साहेब यांचे उदाहरण देत असतो, पवार इतके वयस्क झाले,तरी ते थकले नाहीत,आज इथे तर उधा इतरत्र असतात,वय आणि शरीराची काळजी ते करत नाहीत, त्यामुळे आपण ही वयाची काळजी न करता काम करत राहू असे ते सांगायला विसरले नाहीत,
यावेळी जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे,मधुकर भावे यांची भाषणे झाली.प्रास्ताविक जयप्रकाश दांडेगावकर यांनी तर आभार डॉ.सुनील कदम यांनी मानले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago