नांदेड, बातमी24:- उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बदल्यांची प्रतीक्षा यादीला गुरुवारी दि.1 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा निघाली. यात निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी तर नांदेड तहसीलदार म्हणून किरण अंबेकर यांची नांदेड वापसी झाली आहे.
मागच्या दोन महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या बदल्यांचे आदेश निघणार अशी चर्चा होती. महसूल प्रशासनाने या संबंधीचे आदेश निर्गमित केले आहेत.यात उपविभागीय अधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर पदस्थपना देण्यात आली,तसेच काही उपजिल्हाधिकारी यांच्या सुद्धा बदल्या करण्यात आल्या.तसेच 27 तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. यात लातूर येथून प्रदीप कुलकर्णी हे नांदेड येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदलीने आले आहेत. तर सचिन खल्लाळ यांना भूमीसंपादन उपजिल्हाधिकारी येथे पदस्थपना देण्यात आली.तर बीड येथून किरण अंबेकर हे जऱ्हाड यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर आले आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…