नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवायचे की नाही, याबाबतचा निर्णय रविवारी रात्रीपर्यंत घेणार आहे. यासंबंधी अधिकार्यांची सायंकाळी बैठक आयोजित केली, सर्व सहमतीने जो काही निर्णय होईल तो कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात मागच्या सोमवाारपासून लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. दि. 12 जुलैपासून सुरु झालेले डॉकडाऊन दि. 20 जुलैपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे. लॉकडाऊन वाढवायचे असल्यास किमान चौविस तास अगोदर कळविणे या दृष्टीने महत्वाचे ठरते.
लॉकडाऊन वाढणार की बंद होणार याकडे सकाळपासून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे लक्ष लागून आहे. यासाठी अनेक वाचकांकडून बातमी24.कॉम कडे विचारणा केली जात आहे. या अनुषंगाने वाचकांच्या भावना लक्षात घेता, साडे तीनच्या सुमारास विचारणा करण्यात आली असता, जिल्हाधिकारी डॉ. इटनकर म्हणाले, की लॉकडाऊन वाढवायचे, की थांबवायचे याबाबत सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होईल, त्याबाबत नागरिकांना कळविण्यात येईल, असे डॉ. इटनकर यांनी सांगितले. त्यामुळे सांयकाळच्या बैठकीत काय निर्णय होतो.याकडे जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…