नांदेड, बातमी24ः राज्य शासनाच्या निर्देशानुसार शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलल्या पारदर्शीपणे करण्यात येतील, अशी ग्वाही जि.प.अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी शिक्षक संघटना पदाधिकार्यांसोबत घेतलेल्या बैठकीत केली.
यावर्षी शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या 31 जुलै पर्यंत करावयाच्या असल्याने याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संघटना पदाधिकारी यांची विशेष बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. यावेळी शिक्षण समिती सभापती संजय बेळगे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी डॉ. सुधीर ठोंबरे,शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी के.टी.आमदुरकर, मठपती, बळीराम येरपूलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
बदल्या ऑफलाईन असल्या तरी, प्रक्रिया ऑनलाईन प्रमाणेच करावी. सन.2018-19, 2019-20च्या बदल्यात विस्थापित झालेल्या शिक्षकांना प्राधान्य द्यावे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आवश्कता असल्यास फक्त आपशी/विनंती बदल्या कराव्यात. कोव्हीड-19च्या पार्श्वभूमीवर बदल्या 31 जुलै पर्यंत न करता सप्टेंबर पर्यंत कराव्यात. बदली धोरणानुसार संवर्ग 1,2,3ला प्राधान्य आहेच,परंतु संवर्ग चार म्हणजेच (एकल शिक्षकांवर) अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच तालुक्यात सर्व सवंर्गाच्या रिक्त जागा सारख्या ठेवून समानीकरनाने सर्व संवर्गाच्या समतोल बदलल्या कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…