Categories: नांदेड

सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला अपूर्व ठसा:पालकमंत्री चव्हाण

नांदेड,बातमी24 :-आजच्या काळातील कोणतेही असे क्षेत्र सुटले नसून सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला अपूर्व ठसा उमटवला आहे. कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात महिलांनी आपले कसब व योगदान पणाला लावून जे आव्हान पेलून दाखविले त्याला तोड नाही या शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या शुभसंदेशात महिलांच्या योगदानाचा गौरव केला. आज जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रम व वैद्यकिय क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला कोरोना वॉरीयर्स यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रातपवार व जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य विभागातील सर्व महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.

कोरोनासमवेत इतर वैद्यकिय सेवा-सुविधा सामान्य जनतेसाठी तत्पर ठेवणे हे शासनाचे कर्तव्यच आहे. नांदेड जिल्ह्यातील लोकसंख्या लक्षात घेत ग्रामीण भागात सेवा-सुविधा पोहचविण्यासमवेत आरोग्य विभागाने तब्बल 1 हजार 58 कॅट्रॅक्स आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून यासाठी योगदान देणाऱ्या डॉ. रोशन आरा तडवी यांच्यासह इतर महिला अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गौरव केला. कोरोनाच्या काळात नेत्रशल्यचिकित्सा विभाग सांभाळणाऱ्या डॉ. कल्पना वाकोडे, डॉ. सुजाता राठोड, डॉ. खान साबा अशरफ, डॉ. अर्चना बजाज, प्रयोगशाळा तज्ज्ञ ज्योती बागल, परिचारिका मालती वाघमारे, जयश्री वाघ, अहवाल नोंदणी विभागातील शुभधा गोसावी, अर्पणा जाधव, रुग्ण व्यवस्थापक डॉ. मसरत सिद्दीकी, स्वच्छता विभागातील किरण हटकर, कोमल दुलगच, समुपदेशक ज्योती पिंपळे, संतोषी रतनसिंघ मंगोत्रा, विशाखा आर. बापटे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी हॅपी क्लबचे कार्यकर्ते मोहमंद शोएब यांच्या आई शबाना बेगम यांचाही प्रातिनिधक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मिना सोलापूरे यांनी केले. यावेळी महिलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित केले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, शरद मंडलिक, अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago