नांदेड,बातमी24 : नांदेड परिमंडळातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने दि.१९ ऑक्टोबरपासून चालू केलेल्या धडक मोहिमेत आकोडे टाकून अनधीकृतपणे वीज चोरून वापरणाऱ्या ५ हजार ४३८ वीजचोरांविरोधात मोहीम राबविली गेली. या मोहीमेत तीन ठिकाणी कर्मचाऱ्यास मारहाण झाली.
महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा बसावा, अनधीकृतपणे वीज वापरल्याने रोहीत्रावर जास्त भार येवून रोहीत्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आकोडे टाकून वीज वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहीमेत गेल्या तेरा दिवसात आक्रमकपणे गती देत परिमंडळातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीनही जिल्हयात ५४३८ चोरून वीजवापरणाऱ्या आकोडे बहाद्दरांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
वीज चोरी पकडल्यानंतर ग्राहकांला वीज चोरी केलेल्या युनिटनुसार बिलाची आकारणी करण्यात येते. सदर आकारणीचे बिल न भरल्यास सबंधितांवर गुन्हाही दाखल होवू शकतो. यामध्ये आकडे टाकून विजेचा वापर करणे, शेजाऱ्याकडून अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर करतांना महावितरण कर्मचाऱ्यांना आढळून आल्यास संबंधित ग्राहकांवर विघुत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येत आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…