नांदेड,बातमी24- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करून सिंचन विहिरीच्या कामाचा शुभारंभ केला.
आज मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे बिलोली तालुक्यात दौऱ्यावर होत्या. दरम्यान त्यांनी लोहगाव येथील मोतीराम पिराजी तोटावार यांच्या शिवारात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली. यावेळी त्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी विभागाच्या वतीने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्र बाहेरील या योजनेतूध सिंचन विहिरी लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत. आज सिंचन विहिरीच्या कामाचा शुभारंभ सीईओ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्याचा मानस लाभार्थी मोतीराम तोटावाड यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेतील विशेष घटक योजनेच्या जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री भोसले, नियोजनचे कृषी अधिकारी पी. आर. माने, कृषी अधिकारी व्ही,आर. निरडे, बिलोलीचे कृषी अधिकारी आर.एम. पाटील यांची उपस्थिती होती.
चौकट
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने ही योजना राबवली जाते. तरी संबंधित लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…