नांदेड,बातमी24:- दि.जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 665 अहवालापैकी 1 हजार 287 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 729 तर अँटिजेन तपासणीद्वारे 558 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 67 हजार 887 एवढी झाली असून यातील 52 हजार 541 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13 हजार 828 रुग्ण उपचार घेत असून 197 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
दिनांक 16 ते 18 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 257 एवढी झाली आहे. दिनांक 16 एप्रिल रोजी किनवट कोविड रुग्णालय येथे राजगड तांडा येथील 70 वर्षाची महिला, लोटस कोविड रुग्णालय येथे भगिरथ नगर नांदेड येथील 337 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 78 वर्षाचा पुरुष, भगवती कोविड रुग्णालय येथे शिवाजी नगर नांदेड येथील 74 वर्षाची महिला, दिनांक 17 एप्रिल रोजी गोदावरी कोविड रुग्णालय येथे श्रीवर्धन कॉलनी नांदेड येथील 77 वर्षाची महिला, आशा कोविड रुग्णालय येथे नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालय येथे लोकमित्रनगर नांदेड 70 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे टाकळी ता. देगलूर येथील 83 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे बोरी ता. कंधार येथील 40 वर्षाची महिला, सरसम हिमायतनगर येथील 29 वर्षाचा पुरुष, मनाठा ता. नायगाव येथील 70 वर्षाचा पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, जयनगर नांदेड येथील 35 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 54 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यिकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे बिलोली येथील 55 वर्षाची महिला, नायगाव येथील 62 वर्षाची महिला, भोकर येथील 23 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 54 वर्षाची महिला, लोहा येथील 50 वर्षाचा पुरुष, बडापुरा नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, 55 वर्षाची महिला, बेंदी ता. नायगाव येथील 64 वर्षाची महिला, विष्णुनगर नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, दिनांक 18 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे फुले नगर अर्धापूर येथील 56 वर्षाची महिला, बडापुरा नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, मारवली ता. नायगाव येथील 54 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.39 टक्के आहे.
जिल्ह्यात 13 हजार 828 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…