Categories: नांदेड

1 हजार 291 व्यक्ती कोरोना बाधित तर दहा जणांचा मृत्यू

 

नांदेड,बातमी24:-जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 61 अहवालापैकी 1 हजार 291 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 771 तर अँटिजेन तपासणीद्वारे 520 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 33 हजार 7 एवढी झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चैतन्यनगर नांदेड येथील 54 वर्षाची एक महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 53 वर्षाचा पुरुष, अंबानगर येथील 70 वर्षाची एक महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे राजनगर नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, भाग्यनगर येथील 47 वर्षाची माहिला, खाजगी रुग्णालयात सोमेश कॉलनी येथील 90 वर्षाचा पुरुष, शिवाजीनगर येथील 50 वर्षाचा पुरुष, चैतन्यनगर येथील 68 वर्षाचा पुरुष आणि नांदेड येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे. हे मृत्यू दिनांक 20 ते 22 मार्च 2021 या कालावधीत झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 658 एवढी झाली आहे.

आजच्या 5 हजार 61 अहवालापैकी 3 हजार 390 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 33 हजार 7 एवढी झाली असून यातील 25 हजार 855 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 6 हजार 264 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 566, भोकर तालुक्यात 11, देगलूर 12, हदगाव 2, कंधार 1, लोहा 36, नायगाव 9, परभणी 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 21, बिलोली 5, धर्माबाद 17, हिमायतनगर 14, किनवट 23, मुखेड 33, उमरी 13, यवतमाळ 1, आदिलाबाद 2 असे एकूण 771 बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 341, भोकर तालुक्यात 11, धर्माबाद 7, कंधार 7, लोहा 33, मुदखेड 37, नायगाव 6, परभणी 2, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 15, देगलूर 30, हदगाव 3, किनवट 6, माहूर 16, मुखेड 2, लातूर 2, आदिलाबाद 1 असे एकूण 520 बाधित आढळले.

जिल्ह्यात 6 हजार 264 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 188, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 80, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 99, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 15, किनवट कोविड रुग्णालयात 76, मुखेड कोविड रुग्णालय 125, देगलूर कोविड रुग्णालय 19, हदगाव कोविड रुग्णालय 43, लोहा कोविड रुग्णालय 130, कंधार कोविड केअर सेंटर 20, माडवी कोविड केअर सेंटर 7, बारड कोविड केअर सेंटर 4, महसूल कोविड केअर सेंटर 102, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 132, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 112, खाजगी रुग्णालय 375 आहेत.

सोमवार 22 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago