नांदेड

कोरोना बाधितांची संख्या सोळा हजार पार

 

reनांदेड,बातमी24:- शुक्रवारी आलेल्या अहवालात 158 जण हे बाधित झाले आहेत.जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णाची 16 हजार पार गेली आहे. मागच्या 24 तासात 6 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.सध्या 3 हजार 182 जणांवर उपचार सुरू आहेत.

मागच्या 24 तासात 852 जणांची चाचणी करण्यात आली. यात 678 अहवाल निगेटिव्ह तर 158 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटी पीसीआर चाचणीत 31 व अँटीजनमध्ये 127 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 16 हजार 59 झाली, 12 हजार 399 जणांनी कोरोनावर मात केली.यात आजच्या 216 जणांचा सुद्धा समावेश आहे.तर 3 हजार 182 जणांवर उपचार सुरू असून 38 जणांची प्रकृती गंभीर आहे.
———–
नांदेड येथील जुना मोंढा 55 वर्षीय पुरुषाचा दि.1 रोजी, बिलोली येथील बुडून येथील 30 वर्षीय पुरुषाचा दि.1 रोजी, भोकर येथील 48 वर्षीय पुरुषाचा दि.1 रोजी,टिळकनगर येथील 91 वर्षीय पुरुषाचा दि.1 रोजी, पूर्णा रोडवरील 72 वर्षीय पुरुषाचा दि.2 रोजी,तर नांदेड येथील वैभव नगर येथील 87 वर्षीय पुरुषाचा दि.2 रोजी मृत्यू झाला.आता पर्यंत कोरोनामुळे 412 जणांचा मृत्यू झाला आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago