नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाचशेने घटली असली, तरी मृतांचा आकडा कायम आहे.आजच्या प्रेसनोटमध्ये प्राप्त झालेल्या मृतांच्या आकडेवारीत 45 पेक्षा कमी वय असलेल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे तरुणांनी मला काहीच होत नाही.या भ्रमात न राहता अधिक जागरूक राहिले पाहिजे,यासाठी मास्क,सॅनिटीझर अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
बुधवार दि.21 रोजी 4 हजार 549 चाचण्या कऱण्यात आल्या. यात एक हजार 372 बाधित आले.यात मनपा हद्दीत 489 व ग्रामीण भागात 860 व बाहेरील 23 जणांचा समावेश आहे.
आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये 1 हजार 219 जण असून आतापर्यंत 81 हजार 791 बाधित आले,तर 55 हजार 980 कोरोनामुक्त झाले. तसेच 14 हजार 228 जणांवर उपचार सुरू असून 239 जणांची प्रकृती गंभीर आहे.
——–
25 जणांचा मृत्यू
मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 14 महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे.यात सात तरुणाचा सुद्धा समावेश आहे.पाच पुरुष व दोन महिलांची नोंद आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…