माहूर,बातमी24:- तालुक्यातील मदनापूर करळगाव येथील
पाणीपुरवठ्याच्या फुटलेल्या पाईपमध्ये विष्ठेचे पाणी जावून ते पाणी पिण्यात आल्याने शेकडो जणांना उलटी जुलाबाचा त्रास झाल्याने मागील दोन दिवसात प्रा.आ.केंद्र वाई येथे तब्बल ३६ रूग्ण दाखल झाली आहेत.
माहूर तालुक्यातील मदनापूर येथे ग्रामपंचायतीकडून होत असलेल्या पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटून त्यात विष्ठेचे पाणी जात असल्याने सदरची पाईपलाईन तातडीने दुरूस्त करण्याची वारंवार मागणी काही जागरूक ग्रामस्थांनी सरपंच आडे व ग्रामसेवक सुकळकर यांचेकडे केली होती. परंतू याकडे लक्ष न दिल्यानेे मागील दोन दिवसांपासून येथील नागरीकांना उलटी, संडास, मळमळ व चकर येणे आदी कॉलरासदृश्य त्रास होऊ लागला. दि. १५ जून रोजी १७ तर आज रोजी १९ रूग्ण वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान काल दि.१५ रोजी आरोग्य विभागाकडून डॉ. एस.पी.हुलसुरे यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात आलेल्या पथकाने जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता नळ योजनेची पाईपलाईन फुटून त्यात विष्टेचे पाणी जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याची माहीती पथकप्रमुख डॉ. हुलसुुुुरे यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र वाई येथे अपु-या खाटांमुळे रूग्णावर उपचार करण्यास असंख्य अडचणी येत असल्याचे डॉ. स्वप्नील राठोड यांनी सांगीतले असून आजमितीस केवळ ७ खाटांची उपलब्धता असलेल्या वाई बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात काल १७ रूग्ण तर आज १९ रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगीतले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…