नांदेड

तब्बल 41 हजार 560 युनिटची वीजचोरी उघड

 

नांदेड,बातमी24: वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने दि.14 ऑगस्ट रोजी चालू केलेल्या महामोहिमेत मीटरमध्ये फेरफार करत तसेच आकोडे टाकून अनधीकृतपणे वीज चोरून वापरणाऱ्या 358 वीजचोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली. या मोहीमेत तब्बल 41 हजार 560 युनीटची वीजचोरी झाल्याचे उघड झाले आहे. ही मोहिम यापुढेही चालूच राहणार असून परिमंडळातील तीनही जिल्हयातील सर्व उपविभागा अंतर्गत येणाऱ्या वीजचोरी बहूल गावांमध्ये वीजकायदा २००३ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. या मोहीमेत अडथळा आणणाऱ्या वीजचोरांविरोधात प्रसंगी गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल्‍ असा इशारा मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिला आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा बसावा, अनधीकृतपणे वीज वापरल्याने रोहीत्रावर जास्त भार येवून रोहीत्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आकोडे टाकून वीज वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. या विशेष महामोहीमेस दि.14 ऑगस्ट रोजी आक्रमकपणे गती देत परिमंडळातील नांदेड जिल्हयातील 191 वीजचोरांवर कलम 135 नुसार तर 10 वीजचोरांवर कलम 126 नुसार कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नांदेड शहर विभागातील 125 तर भोकर विभागातील 43 ग्राहक, नांदेड ग्रामीण विभगातील 31 तर देगलूर विभागातील 59 वीजचोरांचा समावेश आहे. त्याचबरोबर परभणी जिल्हयातील 112 आकोडे वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. तर हिंगोली जिल्हयातील 06 आकोडे बहाद्दर वीजचोरांवरती कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर या मोहीमेत आकडा टाकून चोरुन वीज वापराणाऱ्या 154 शेतकऱ्यांचे आकडे काढण्यात आले असून केबल जप्त करुन वीजकायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित ग्राहकांवर विघुत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येत आहे. यात थकबाकीदार ग्राहकाने शेजाऱ्याकडून विजेचा वापर केल्यास व शेजाऱ्याने परस्पर वीज पुरवठा केल्यास दोघांवरही कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये शेजाऱ्याकडून मीटरही बंद होवू शकते. व आकडा टाकून विजेचा वापर करणे, वीजवाहिनीमध्ये छेडछाड करुन विजेचा वापर केल्यास संबंधीत ग्राहकांवर कलम १३५, १३८ नुसार कारवाई करण्यात येते. वीज चोरीच्या प्रकरणात गुन्हा सिध्द झाल्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होवू शकते. त्यामुळे अधीकृत वीजजोडणी घेवूनच वीजवापर करावा असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

बेधडकपणे राबविलेल्या या महामोहीमेत 18 चमूचा समावेश होता. यामध्ये 27 अभियंते, 90 जनमित्र तर 18 लेखाधिकाऱ्यांचा समावेश होता. ही मोहीम यशश्वी करण्यासाठी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या निर्देशानुसार नांदेड मंडळाची सुत्रे हाती घेतलेले नवनियुक्त्‍ अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, परभणीचे अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे त्याचबरोबर कार्यकारी अभियंता जे.एल.चव्हाण, मोहन गोपूलवाड, आर.पी.चव्हाण, श्रीनिवस चटलावार, श्री जमदाडे तसेच श्रीमती रजनी देशमूख आणि सर्व उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंते यांनी परिश्रम घेतले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago