नांदेड,बातमी24- नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आज जिल्हा परिषद शाळातील 925 शिक्षकांना चटोपाध्याय वरिष्ठ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आज मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी हे आदेश प्रदान केले आहेत. यावेळी शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी बंडू अमदूरकर यांच्यासह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेतन श्रेणी लागू करून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शिक्षकांना गुढीपाडवा भेट दिली आहे.
ज्या शिक्षकांना सेवेतील बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा शिक्षकांना चटोपाध्याय वेतन श्रेणी देवून वेतन निश्चिती लागू करण्यात येते. याबाबत शासनामार्फत वेळोवेळी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. नांदेड जिल्हा परिषदेत गेल्या तीन-चार वर्षांपासून चटोपाध्याय वेतन श्रेणीचा प्रश्न प्रलंबित होता. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी या विषयात लक्ष घालून शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेळो-वेळी बैठका घेऊन हा प्रश्न निकाली काढला आहे. आज चटोपाध्याय वरिष्ठ श्रेणीचे आदेश प्रदान करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने निवड श्रेणी देण्याची नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
या वेतन श्रेणीत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्यापध्यापक व केंद्र प्रमुख या संवर्गांचा समावेश आहे. या वेतन श्रेणीसाठी विविध शिक्षक संघटनेने मागणी केली होती. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी शिक्षणाधिकारी व संबंधीत कर्मचा-यांची प्रथम बैठक घेतली. त्यानंतर वेळोवेळी बैठका घेवून हा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. यासाठी 964 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. त्यापैकी 39 जणांच्या त्रुत्री आढळल्याने हे प्रस्ताव अपात्र ठरण्यात आले. पात्र 925 शिक्षकांना आज चटोपाध्याय वेतन श्रेणी देण्यात आली आहे.
*चौकट*
*विविध संघटनेने मानले प्रशासनाचे आभार*
चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्याच्या मागणीचा प्रस्ताव विविध शिक्षक संघटनेचा होता. या मागणीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पाठपुरावा करून जिल्ह्यातील सुमारे 925 शिक्षकांना आज चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू केलेली आहे. राज्यात नांदेड जिल्हा परिषदेने सर्वाधिक शिक्षकांना एकाचवेळी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा लाभ दिलेला आहे. त्याबद्दल विविध शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांचे आभार मानून बुके देऊन सत्कार केला.
*चौकट*
येत्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. यामध्ये शिक्षक परिषद व नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असेल. जिल्हा परिषदेच्या शाळांची प्रतिमा बदलून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी पुढे यावे असेही त्या म्हणाल्या. नांदेड जिल्हयातील शाळांनी विविध उपक्रमशील प्रयोग केले आहेत. बोलक्या भिंती, डिजिटल शाळा ही आपली ओळख पुढेही कायम ठेवून दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी शिक्षक संघटनांनी पुढे यावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकाशक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…