नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोजचा आकडा शंभरीपार जात आहे. यात दोनशे रुग्णांची भर सुद्धा पडलेली आहे. जशी-जशी रुग्णांची संख्या वाढत असताना गंभीर रुग्णांचा आकडा लांबत आहे. आजमितीस जिल्ह्यात 53 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ही संख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरत आहे.
मंगळवारी नांदेड जिल्ह्यात 137 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 2 हजार 496 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 1 हजार 57 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. तर 1 हजार 329 जणांवर उपचार सुरु आहेत. यात 53 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.37 महिल व 16 पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 97 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर इतर जिल्हयातील दहा ते पंधरा जण मरण पावले आहेत. दिवसाकाठी कोरोनामुळे मरण पावणारांचा आकडा तीन ते चार असतो. यापूर्वी एकाच दिवशी दहा जणांनी कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण सोडल्याची नोंद आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…