Categories: नांदेड

अ‍ॅड.किशोर देशमुखांनी आणले युवा मोर्चात नवचैतन्य

नांदेड, बातमी24ः- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात आलेल्या अर्धापुर येथील नेते अ‍ॅड.किशोर देशमुख यांनी भाजपा युवा मोर्चाची कमान संभाळल्यानंतर पक्षात कार्यात तना-मनाने वाहून घेतले, असून संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. त्यामुळे काहीशी मरगळ आलेल्या युवा मोर्चात अ‍ॅड.किशोर देशमुख यांच्या रुपाने चैतन्य आल्याचे बोलले जात आहे.

विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या बापूसाहेब गोरठेकर यांच्यासोबत भाजप प्रवेश केला. राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश पातळीवर काम केल्याचा अनुभव गाठिशी असलेल्या अ‍ॅड. किशोर देशमुख यांचा दांडगा संपर्क आहे. अर्धापुर तालुक्याच्या राजकारणावर ही त्यांची पक्कड राहिलेली आहे.

व्यवसायाने वकिल असलेल्या आणि राजकारण व समाजकारणाची आवड असलेले अ‍ॅड.किशोर देशमुख हे वीस ते पंचविस वर्षांच्या सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय आहेत. त्यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपा युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची कमान सोपविली.नियुक्तीच्या पहिल्या दिवसांपासून अ‍ॅड. किशोर देशमुख यांनी युवकांमधील संघटनबांधणीच्या कामात स्वतः झोकून दिले आहे.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्ता भेटी व त्यानंतर वीज दरवाढीचे आंदोलन प्रत्येक तालुक्यात व गावा-गावात पेटविले आहे. या आंदोलनाला सामान्यांचा ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पक्षाने काम करण्याची संधी दिली, माझे नशिब मानतो, परंतु चांगले काम करून पक्षाला उभारी देण्यासाठी एक-एक क्षण वेचण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात हजारो युवकांना युवा मोर्चाशी जोडण्याचा प्रयत्न असणार असल्याचेअ‍ॅड. किशोर देशमुख यांनी सांगितले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago