नांदेड,बातमी24 :- भारतीय संस्कृतीतील वटपौर्णिमेला पर्यावरण साक्षरतेचा दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. यादिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पुजा करण्याची परंपरा आहे. यातील पर्यावरणाचा धागा लक्षात घेता प्रत्येकाने आजच्या दिवशी एक तरी वडाचे झाड लावावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मान्यवरांच्या हस्ते वडाच्या झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्ताने त्या बोलत होत्या. मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटील, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांची उपस्थिती होती.
गावात तसेच आपल्या परिसरात वटवृक्षाची लागवड करुन ऑक्सीजन टँक निर्माण करावेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजनचे मुल्य प्रत्येकाने ओळखले असून ऑक्सीजन वृध्दीसाठी व पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन वर्षा ठाकूर घुगे यांनी केले. हरित नांदेडच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे उचलले आहे, असे त्यांनी सांगितले.
वटपौर्णिमेनिमित्त आज जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात वडवृक्ष लागवड करण्यात येत. जिल्ह्यात एकाच वेळी सुमारे नऊ हजार वृक्षांची लागवड करण्याची ही मोहीम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमात गावागावात वडांच्या झाडांची लागवड करण्यात येत आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…