नांदेड,बातमी24:-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे.त्यांचा भाजप जाण्याने मराठवाडा व नांदेड जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लागतील,त्यामुळे चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो,आम्ही त्यांच्या निर्णयाशी सहमत असल्याचे काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काल आमदारकी व पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.नांदेड जिल्ह्यात ही कोण सोबत असणार किंवा नसणार यावर उलटसुलट चर्चा सुरू होती.
या सगळ्या घडामोडीवरून भास्करराव पाटील खतगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला,यावेळी बोलताना ते म्हणाले,की मराठवाड्यातील व नांदेड जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न प्रलंबित आहे. येथील विकासाचे प्रश्न सोडवायचे असतील अशोक चव्हाण यांच्या इतका मोठा कुणीही नाही.केंद्रात वजनदार नेता नसल्याने ते प्रश्न मार्गी लागत नाही,मात्र अशोक चव्हाण यांच्या भाजप जाण्याने विकासाचे प्रश्न मार्गी लागतील,अशोक चव्हाण यांच्याकडे विकासाचा दृष्टीकोन असून प्रश्नाची जण असणार नेतृत्व असल्याने येथील विकासाचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास खतगावकर यांनी व्यक्त केला.त्यामुके माझी व माझ्या सहकार्याची भूमिका ही अशोक चव्हाण यांच्या सोबत असून त्यांच्या पाठीशी ताकदीने राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला माजी आमदार अविनाश घाटे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर,सरजितसिंह गिल, नवल पोकर्णा,दीपक पावडे आदींची उपस्थिती होती.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…