नांदेड,बातमी24:- आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र सिडको नांदेड येथे राज्यस्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा दि.26 जून रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. प्रवेश पूर्व परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्यासाठी जुलै ते डिसेंबर 2023 च्या दरम्यान सहा महिन्यांये यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा निवासी मार्गदर्शन वर्गात अत्यंत नाममात्र शुल्क घेऊन प्रवेश दिला जाणार आहे,अशी माहिती आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी दिली.
सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी शेतमजुरांच्या पाल्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
मुली व मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह,24 तास अभ्यासिका यूपीएससी एमपीएससी साठी इंग्रजी व मराठी माध्यमातून मार्गदर्शन वर्ग,छापील नोट्स,टेस्ट सिरीज, ग्रंथालय या सुविधा विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणार असून
परीक्षेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी भोजनाची निशुल्क व्यवस्था करण्यात आली असल्याचे कदम यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात भाग घेऊन मार्गदर्शन वर्गात प्रवेश घ्यावा व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कदम यांनी केले आहे. नाव नोंदवण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क 9326932049
9370753059 वरील नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…