नांदेड

रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ;सात जणांचा बळी

 

नांदेड, बातमी24:-कोरोनाच्या रुग्णसंख्येत शनिवार दि.20 रोजी मोठी वाढ झाली,असून 947 रुग्ण वाढले आहेत,तर 7 जणांचा बळी या संसर्गाच्या विषाणूमुळे झाला आहे.

कोरोनाची आकडेवारी डोकं गांगरून टाकणारी येत असून झपाट्याने वाढत जाणारे आकडे प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे.यातून रुग्णालय सुद्धा हाऊसफुल होत चालले आहेत.

मागच्या 24 तासात 3 हजार 896 चाचण्या करण्यात आल्या. यात 2 हजार 723 निगेटिव्ह तर 947 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यात मनपा हद्दीत 579 जणांचा समावेश आहे. आरटीपीसीसार चाचणीत 509 तसेच अँटीजनमध्ये 438 जणांचा समावेश आहे.

यासह सात जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. यात चार पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. मरण पावले सर्व जण हे 50 ते 80 वयोगटातील आहेत. त्यामुळे आतापर्यंत 639 जण दगावले गेले.4 हजार 770 बाधितावर उपचार सुरू असून यातील 47 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago