नांदेड

आयुर्वेदिक महाविद्यालयात  खाटांची व्यवस्था करा – आ. कल्याणकर

नांदेड, बातमी24ः आयुर्वेदिक महाविद्यालयात कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोव्हीड केअर सेंटरची नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी पाहणी केली असून वैद्यकीय अधिकार्‍यांना व लवकरात लवकर रुग्णांसाठी नवीन 60 सुसज्य खाटांची व्यवस्था करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजपूत यांना सूचना केल्या.

सध्या सर्वत्र कोरोणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात गर्दी होत आहे, यातून रुग्णांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत. वैद्यकीय विभागाकडून देखील रुग्णांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आ. बालाजी कल्याणकर यांनी दोन दिवसापूर्वीच शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. पुन्हा बुधवारी शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालय येथील कोव्हीड केअर सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली.

सध्या आयुर्वेदिक महाविद्यालयात वैद्यकीय अधिकार्‍यांची कमतरता भासत असल्याने, पुढील काळात वैद्यकीय अधिकार्‍यांचा भरणा करण्याची मागणी ही यावेळी केली. तसेच चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्‍यांची देखील कमतरता असल्याचे सांगितले. या बाबत आ. कल्याणकर हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अशोकराव चव्हाण याच्याकडे तक्रारी मांडणार असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago