नांदेड

जिल्हाधिकार्‍यांसह बडया अधिकार्‍यांच्या स्वॅबकडे लक्ष; … या दिवशी देणार स्वॅब

नांदेड, बातमी24ः- काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमरनाथ राजुरकर हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याने हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह काही अधिकारी होम क्वॉरंटाईन झाले आहेत. हे सर्व अधिकारी गुुरुवारी स्वॅब देणार असून त्यांच्या स्वॅबकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

आ. राजूरकर हे मधल्या काळात मुंबई येथे गेले होते. मुंबई येथे असतानाच त्यांना सर्दी झाली होती. मुंबई येथेच तपासणी केली होती. परंतु अहवाल निगेटीव्ह आला होता. नांदेड येथे तपासणी केली, असता त्यांचा व त्यांच्या मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची तपासणी करण्यात आली. यात सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

शनिवारच्या बैठकीस राजूरकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहिल्याने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हापरिषद प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, आरोग्य अधिकारी डॉ.पवार, जिल्हापरिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. कोंढेकर, पोलिस अधिकारी पवार आदी होम क्वॉरंटाईन झाले आहेत. या सर्व अधिकार्‍यांचा स्वॅब गुरुवारी घेतला जाणार आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago