नांदेड, बातमी24ः-बॉलीवुड शहनशाह अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण रविवारी दिवसभर चर्चे विषय असताना नांदेड जिल्ह्यात ही कोरोनाच्या रुग्णांची सहाशेचा आकडा पार केला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मात्र यातील तिघांचे अहवाल प्रलंबित आहे. यात नऊ महिन्याच्या चिमुकलीचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे तिघांच्या मृत्यूचा अहवालाकडे नातेवाईकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नांदेड जिल्ह्यात मागच्या वीस तासात 44 रुग्णांची तर हिंगोली, परभणी व लातूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे तीन रुग्ण हे नांदेडमध्ये उपचार घेत आहेत. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने वाढत आहे. रविवारी परभणी येथील 34 व नांदेड शहरातील सोमेश कॉलनी येथील 75 वर्षीय रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दोन्ही मृत्यू हे कोरेानामुळे झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचसोबत रविवारी दिवसभराच्या काळात इतर तिन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुखेडमधील तबोलागल्ली येथील 85 वर्षीय इसम ज्यांना दि. 10 जुलै रोजी रुग्णालयात दाखल केले आहे. लातुर जिल्हयातील जळकोट येथील 60 वर्षीय तर नांदेड तालुक्यातील धनेगाव येथील 9 महिन्यांची चिमुकली सुद्धा मृत्यू झाला आहे. या तिन्ही मयतांचे अहवाल प्रलंबित आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजणार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…