नांदेड,बातमी24:- प्रत्येक जीवनासाठी पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. या पाण्याचे महत्त्व अधोरेखीत करुन त्याचा सर्वकाळ उपलब्धता, सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी सोमवार दि.२२ मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त जिल्ह्यात दि.२२ मार्च ते दि.२७ मार्च २०२१ या कालावधीत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या , दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. त्या अनुषंगाने पाण्याचे महत्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाण्याचे महत्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व ग्रामीण पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी शुद्धता, पाणी वाचवा, पाणी सुरक्षितता आदीबाबत विविध उपक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर दि.२२ मार्च ते २७ मार्च २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहांर्तगत २२ मार्च रोजी तालुकास्तरावरील नियोजन बैठकीमध्ये जलप्रतिज्ञा घेऊन जलसप्ताहाचा शपथ देऊन शुभारंभ करणे, २३ मार्च रोजी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि सप्ताहाची व्यापकता पटवून देणे, २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजीटल माध्यमांचा वापर करुन समजावून सांगणे, दिनांक २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दुषित आलेल्या स्त्रोतांचे उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे, दिनांक २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल तर दिनांक २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे, शुन्य गळती मोहिम, नादुरुस्त स्त्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
दरम्यान सदरचे उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमावलीच्या उपाययोजनेबाबत केलेल्या प्रचलित नियमानुसार व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…