नांदेड,बातमी24:- देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर हर घर तिरंगा हे देशव्यापी अभियान राबवून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे.या अनुषंगाने हर घर तिरंगा महोत्सव बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते आयईसी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून उदघाटन करण्यात आले.
आजादी का अमृत महोत्सवाच्या दृष्टीने हर घर तिरंगा उत्सव दि.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरो-घरी झेंडा लावून साजरा केला जाणार आहे. या उत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यातील साडे सात लाख घरांवर तिरंगा ध्वज लावण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने बचतगटाच्या माध्यमातून हर घर तिरंगा अभियान ही चळवळ गतिमान केली आहे.
हर घर तिरंगी अभियानासंबंधी माहिती अधिक-अधिक नागरिकांपर्यंत पोहचली पाहिजे,या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एलईडी डिजीटल मोबाईल व्हॅनद्वारे सर्वत्र जनजागृती अभियान राबविले जात असून या संबंधी उदघाटन डॉ. इटनकर यांनी रविवार दि.7रोजी केले. आयईसी व्हॅनद्वारे व्यापक जागृती करून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा ध्वज लावून हे अभियान यशस्वी करण्यात येईल असा विश्वास डॉ.इटनकर यांनी व्यक्त केला.
यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयेळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी, विकास माने, तहसीलदार किरण अंबेकर,नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी,काशीनाथ डांगे,व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी व काही प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…