नांदेड,बातमी24:- वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजपा महानगर च्या वतीने महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि. 2 जुलै रोजी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली. तसेच यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तीन महिने टाळेबंदी होती . त्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प होते. एप्रिल ते जून या महिन्याचे तीस ते चाळीस हजाराच्या आसपास एकत्रित बिल दिले आहे. कुठलीही सरासरी गृहीत न धरता अंदाजे हजारो रुपयांचा भुर्दंड जनतेच्या माथी मारला असल्याचा आरोप करण्यात आला.
राज्य सरकार व वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात युवा मोर्चा प्रदेश प्रभारी संजय कौडगे, वैद्यकीय आघाडीचे डॉ.अजित गोपछडे, सरचिटणीस विजय गंभीरे, अशोक पाटील, व्यंकटराव मोकले, उपाध्यक्ष प्रभू कपाटे, सुशील चव्हाण, राजेंद्रसिंग पुजारी, शीतल खंडील, सुनील राणे, शीतल भालके, नवल पोकर्ना,
अकबरखान पठाण, महादेवी मठपती, गायत्री तपके, सुषमा ठाकूर, किरपालसिंग यांच्यासह शेकडोजण सहभागी झाले होते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…