नांदेड

सर्व विभागांचा समतोल राखत उपाध्यक्ष पद्मा रेड्डी यांनी मांडला 27 कोटींना अर्थसंकल्प

नांदेड,बातमी24:-जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती पद्मा रेड्डी यांनी 27 कोटी 44 लाख रुपये किंमतीचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे मांडला.यावेळी पद्मा रेड्डी यांनी सर्व विभागांचा सर्वोतपरी समतोल राखण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला आहे.

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा बुधवार दि.17 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन घेण्यात आली.या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अबुलगेकर, उपाध्यक्ष पद्मा रेडी, सीईओ वर्षा ठाकूर, सभापतो रामराव नाईक,सभापती संजग बेलगे, सभापती बाळासाहेब रावनगावकर, सभापती सुशीला बेटमोगरेकर,लेख व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे यांच्यासह विभागप्रमुख व सदस्य हे ऑनलाइनने जोडले गेले होते.

यावेळी पद्मा रेड्डी यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा लाभाव्या यासाठी 27 कोटी 44 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सभेसमोर मांडला. यामध्ये सन 2020-21 चे सुधारित तसेच 2021-2022 चे मूळ अंदाजपत्रक सादर केले.यात 2020-21 ची सुधारित जमा 27 कोटी 44 लाख 39 हजार 851 निवळ महसुली जमा 21 कोटी 5 लाख 53 हजार 933 इतकी एवढी आहे,यातील महसुली खर्च हा 27 कोटी 43 लाख 47 हजार 590 इतका झाला,असून 92 हजार 261 रुपये शिलकी आहे.

सन 2021-22 ची अंदाजित जमा 19 कोटी 6 लाख 915 एवढी आहे.वयक्तिक लाभाच्या योजनेत महिलासाठी 30 टक्के निधी राखीव ठेवला आहे.त्यामुळे महिला सुविधा मिळू शकणार आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago