नांदेड

सुधारित आदेश आल्याने बारगळ यांना खुर्ची सोडावी लागणार

नांदेड, बातमी24:-मागच्या वेळी आदेशात चुकीचे नाव छापून आल्याने खुर्चीला काही दिवस चिटकून बसलेल्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.बारगळ यांना सुधारित आदेश आल्याने खुर्ची सोडणे भाग पडणार आहे. नवीन अधिकारी येऊ नये,यासाठी बारगल हे प्रशासनावर दबाव आणू पाहत असले,तरी त्यांच्या दबावाला सीईओ वर्षा ठाकूर बळी पडतील ही शक्यता कमीच आहे.

कार्यकारी अभियंता जोशी यांच्या सेवानिवृत्तीपासून पाणी पुरवठा विभागाचा पदभार देगलूर विभागाचे उपअभियंता बारगळ यंच्याकडे आहे.या काळात त्यांनी स्वतःची अडगळीत पडलेली कामे वरिष्ठांना हाताशी धरून पूर्ण केली. मात्र विभागातील एकसंघ भावना मोडीत काढली.

विभागातील अधिकारी असो,की कर्मचारी कुणाशी बारगळ यांनी सलोख्याचे संबंध ठेवले नाही. अधिकारी व कर्मचारी यांना मानसिक त्रास देण्याचे काम केल्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे म्हणणे आहे. एक कार्यलीयन कर्मचाऱ्याने बारगळ यांनी दिलेल्या त्रासाचे कथन करताना त्या कर्मचाऱ्यास सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ठोबरे यांच्या समोर अश्रू अनावर झाले होते.

प्रभारी पदाची मिळालेली खुर्ची आयुष्यभराची पूर्ण वेळ हक्क असल्यासारखे बारगळ यांचे वर्तन राहिले.त्यामुळे मागच्या वेळी आदेश होऊन ही बारगळ यांनी खर्ची सोडली नव्हती.यावेळी आदेशात सुधारणा झाली आहे.त्यांच्या जागी बावस्कर यांचे सुधारित आदेश आल्याने त्यांना रुजू करून घेणे प्रशासनास क्रमप्राप्त ठरणार आहे. ते रुजू झाल्यास बारगळ यांची हुकूमशाही राजवटीचा अध्याय ही संपणार आहे.या विभागातील अधिकारी व कर्मचारी अधिक जोमाने अधिक चांगले काम करतील,असे बोलले जात आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago