नांदेड,बातमी24:-कोरोनामूळे जिल्ह्यातील जे व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या कुटूंबातील लहान मुलांची हेळसांड होवू नये या उद्देशाने नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गंत आजवर जिल्ह्यातील 717 व्यक्तींना विविध योजनाचा लाभ दिला. राज्य शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली.
या टास्क फोर्समार्फत डॉ. इटनकर यांनी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पिडीत कुटूंबासाठी महसूल विभाग, महिला व बाल विकास विभाग, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि सामाजिक न्याय विभागातील योजनांचा त्या-त्या कुटूंबाच्या पात्रतेनुसार लाभ देण्याचे निश्चित केले. यादृष्टीने संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची माहिती पडताळून घेऊन त्याबाबत सविस्तर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सद्यस्थीतीत 659 कुटूंबाची नोंदणी झाली.
नोंदणी झालेल्या कुटूंबापैकी योजनानिहाय गोषवारा पुढीलप्रमाणे आहे. महसूल विभागांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेत 127, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत 40, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेत 19, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेत 17, इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्ती वेतन योजनेत 7, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेत 32 कुटूंबाची नोंदणी झाली. तर महिला व बाल विकास विभागाच्या योजनेंतर्गंत बाल संगोपन योजना 201जणांना लाभ दिला. शिशुगृह योजना, बालगृह योजना व शुभमंगल सामुहिक विवाह योजनेसाठी सद्यस्थीतीत पात्र लाभार्थी मिळाले नाहीत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय योजना 58, प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना 99, एपीएल केशरी शेतकरी योजनेत 64 कुटुंबियांची नोंद झाली आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत शालेय विद्यार्थी इयत्ता 6 ते 10 साठी निवासी शाळा योजनेत 27 तर माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजनेत 26 व्यक्तींच्या कुटूंबियांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…