नांदेड

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

 

नांदेड,बातमी24:- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी 2021 रोजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, सीईओ वर्षा ठाकूर यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने मंगळवार रोजी सकाळी-9.15 वा.डिजिटल एलईडी चित्ररथाचे पालकमंत्री महोदयांसमोर शासकीय कार्यक्रमात प्रदर्शन करण्यात आले.जिल्ह्यातील गावा- गावातून बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा प्रचार करण्यासाठी एलईडी व्हॅनचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण, मंगराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ.इटनकर,वर्षा ठाकूर,महिला व बालकल्याण सभापती सुशीला बेटमोगरेकर, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील शिंगणे आदींच्या उपस्थित झाला.

बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत सन- 2020- 21 च्या कृती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेंतर्गत घरावरील नावाच्या पाटीवर मुलीचे नाव लिहिण्याचा जो उपक्रम हाती घेण्यात आला आहे, त्या मुलीच्या नावासह असलेल्या घराच्या पाटीचे अनावरण अशोक चव्हाण यांनी केले.

बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत बालविवाह प्रतिबंधासाठी व त्याबाबतच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या बिल्यांचे अनावरणही करण्यात आले.

यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर,आमदार मोहनराव हंबर्डे,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटटमोगरेकर,निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, विजय बोराटे, सुधीर सोनवणे आदींची उपस्थिती होती.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago