नांदेड

13 ते 15 आगस्ट दरम्यान हर घर झेंडा फडकणार:-जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची माहिती

नांदेड,बातमी24:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान जिह्यातील सर्व घरांवर तिरंगा झेंडा फडकणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे सोमवार दि.18 रोजी ते बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तुबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ.इटनकर म्हणाले,की केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने घर तिथे तिरंगा ध्वज लावण्याच्या सूचना असून या अभियानाची प्रशासनाकडून तयारी सोबतच वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. त्या अनुषंगाने साडे सात लाख झेंडे आवश्यकता असून जिल्ह्यात साडे सात कुटूंबसंख्या असून यात नांदेड शहरात दीड लाख। ग्रामीण भागात साडे पाच लाख घरे आहेत.

जिल्ह्यात 50 हजार कर्मचारी असून एक कर्मचारी या प्रमाणे 150 लाख झेंडे हे प्रशासन खरेडी करून वंचित कुटूंबाला दिली जाणार आहेत,त्याचसोबत काही व्यवसायिक मंडळी सुद्धा झेंडे खरेडी करून देणार आहेत,तसेच छोटे-मोठे व्यापारी,दुकानदार सोबतच रास्त धान्य दुकान येथे सुद्धा झेंडे विकायला ठेवले जाणार असल्याचे डॉ.इटनकर यांनी सांगितले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago