नांदेड,बातमी24ः- मागच्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या कौठा येथील नियोजित महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळयाच्या कामाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या पुतळयाचे भूमिपूजन शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी भूमिपुजन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी दिली.
कवठा येथे महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी समाज बांधवांकडून केली होती. अखेर ही मागणी प्रत्यक्षात उतरली, असून
नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या कौठा परिसरातील नियोजित जागी शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अश्वारुढ पुतळयाचे नियोजित कामाचे भूमिपुजन अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असून या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी महापौर किशोर स्वामी, जिल्हापरिषद शिक्षण सभापती संजय बेळगे, बालाजी पांडागळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…