जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24:- ज्ञानावर कुणाचीही मक्तेदारी असू शकत नाही.हे शिक्षणाने अधोरेखित केलेले आहे.जो ज्ञान मिळविल तो यशाचा शिखरावर पोहचलेला असतो.मात्र त्या मागे जिद्द, चिकाटी व ध्येय निश्चित असेल तर आपणास कुणीही रोखू शकत नाही.अशीच यशोगाथा आहे, नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद येथील झिरोतून हिरो झालेल्या युवकाची होय.आज तो जपानमधील उधोजक कम आणि आघाडीचा संशोधक आहे.ज्याला बारावीत दोन वेळा अपयश आले.तोकाही काळ ट्रक चालक ही राहिला.नापास झालेला युवक अखेर शिक्षणाकडे वळला आणि स्वतःच जग बदलून टाकलं,ही युवकाच्या यशोगाथेचा प्रेरणादायी प्रवास प्रत्येकासाठी कायम प्रेरणेचा झरा असेल.
दारिद्र्यदायी कुटूंबात जन्मलेल्या चैतन्य भंडारे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण हुतात्मा पानसरे हायस्कुलमध्ये झाले,जेमतेम दहावीनंतर बारावीमध्ये पास होण्यासाठी एका खेडे गावात प्रवेश घेतला. मात्र एका दमात बारावी ते उत्तीर्ण झाले नाही.विज्ञान शाखेतील सर्व विषयात चांगले मार्क घेतलेल्या चैतन्य हे एका विषयात नापास झाले.ते विषय पास होण्यासाठी दोन वेळा परीक्षा द्यावी लागली. पास होणे काही अवघड नव्हते;पण त्या दरम्यान त्यांना ट्रक चालविण्याची आवड लागली.यातून पैसे येत असल्याने शिक्षणाकडे त्यांचे पार दुर्लक्ष झाले.पोरगा हुशार असून ट्रॅक चालवायला लागल्याचे आईस आवडत नव्हते.एकदिवस त्यांच्या आईने ट्रक विकून टाकला आणि चैतन्य यास औरंगाबादला बारावीनंतरच्या शिक्षणासाठी मिलिंद महाविद्यालयात टाकले.विज्ञान शाखेतून पदवी शिक्षण घेतलेल्या चैतन्य यांनी भोपाळ व नंतर गोवा येथून मत्स्य विज्ञान शाखेत संशोधनाचे धडे घेतले.
या नंतर पुढील संशोधन कार्य करण्यासाठी जपान गेलेल्या चैतन्य यास शिष्यवृत्ती मिळाली. या जोरावर पुढील शिक्षण चालू ठेवले.भारतामधील शिक्षणासाठी जपानमध्ये जाणाऱ्या तीन जणांना मेकसा नावे जपान सरकार शिष्यवृत्ती देते,ती शिष्यवृत्ती चैतन्य भंडारे यांना मिळाली.त्या जोरावर त्यांनी संशोधन कार्य चालु ठेवले. सहाय्य प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य ते जपानमध्ये करतात.
काही वर्षांपूर्वी चैतन्य भंडारे यांनी दोन कंपन्या उभारल्या असून या कपन्यांमधून भारत व जपान या दोन देशामधील आयात व निर्यात असा व्यवहार चालत असतो,असे चैतन्य भंडारे यांनी सांगितले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये चैतन्य भंडारे हे भारतीय संघाचे प्रमुख स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावली आहे. भारतातून टोकियो येथे गेलेल्या भारतीय खेळाडूंचे ते आधार होते.भारत आणि जपान या दोन देशामधील ऑलम्पिक खेळा संबंधी समनव्य अशी महत्वपूर्ण जबाबदारी चैतन्य भंडारे यांनी पार पडली आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेले दहावीनंतर बारावी पास होण्यासाठी तीन वेळा परीक्षा दिलेले चैतन्य भंडारे हे औरंगाबाद येथे शिकायला आई वडिलांच्या आदेशाने गेले,त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितलेच नाही.खडतरपणे मार्गक्रमण करणाऱ्या चैतन्य भंडारे यांनी जपानमध्ये भारताचा ठसा उमटविला तर आहेच,शिवाय आलोम्पिकच्या निमीत्ताने त्यांची राज्याला ओळख झाली.शिवाय चैतन्य भंडारे यांच्यामुळे नांदेडचा मान सातासमुद्रापार उंचावला गेला आहे.याबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटद्वारे चैतन्य भंडारे यांचे अभिनंदन केले. दोन वर्षांपूर्वी ते धर्माबाद येथे शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या वर्गमित्र मेळाव्यात ते जपान येथून आले होते.यावेळी सर्वांना जपानमधील फॅन भेट दिले होते.अशी माहिती त्यांचे शालेय मित्र विश्वनाथ आरगुलवार यांनी सांगितले.
चैतन्य हा सुरुवातीपासून मेहनती होता. आज जपान राहून भारताचं प्रतिनिधित्व करतोय यापेक्षा दुसरा अभिमान धर्माबादकरांसाठी असू शकत नाही.
मिसाळे गुरुजी
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…