नांदेड,बातमी24ः बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषदेचे भाजपचे स्विकृत नगरसेवकाने बनावेट कागदपत्रे तयार करून पद लाटल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या पंढरी लिंगन्ना पुपलवार यास 26 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मांटे यांनी दिली.
आरोपी पंढरी पुपलवार याने पद मिळविण्यासाठी एका सेवाभावी संस्थेचे बनावट दस्तावेज सादर केले होते. या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस स्टेशनमध्ये 4 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आरोपी पंढरी पुपलवार यास 26 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आले. पंढरी लिंगन्ना पुपलवार यांनी नामनिर्देशन निवडणुकीवेळी नागपूर येथील विश्वभुषण युवक कल्याण सेवा व सांस्कृतिक संस्था भगवाननगर, नागपूर यांचे सहसचिव म्हणून बनावट दस्तावेज सादर केला होता. त्या आधारे स्विकृत नगरसेवकपदाचा लाभ घेतला होता. या प्रकरणात भाजपचे नगरसेवक सुरेश कोंडावार यांनी तक्रार केली होती. यावरून दि.4 जुलै 2020 आरोपी पंढरी लिंगन्ना पुपलवार याच्याविरुद्ध कलम 420,467,468,471 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…