नांदेड,बातमी24:- डॉक्टर्स डे निमित्त जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आवाहन केलेल्या रक्तदान शिबिरात नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी यांच्यासह काही रक्तदात्यांनी रक्त दान केले.
राज्यात ज्या प्रमाणे एक जुलै हा कृषीदिन म्हणून साजरा केला जातो.तसाच एक जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली.
या दिनाचे औचित्यसाधून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या,यावरून शहरातील विविध रक्त बँकांना सूचित करून बुधवार दि.एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून या शिबिरास सुरुवात झाली.
दुपारी दोन वाजेपर्यंत 60 ते 70 दात्यांनी रक्तदान केले. यामध्ये विविध अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुख व काही अधिकाऱ्यांनी रक्तदान केले.यामध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे,शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, पशुसंवर्धन विकास अधिकारी शिवाजी पवार, बंडू आमदूरकर आदींनी सहभाग घेतला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…