नांदेड

केक कापून महिला दिन साजरा; जिल्हाधिकाऱ्यांनी उंचावला सीईओचा मान

जयपाल वाघमारे

नांदेड,बातमी24:- काल दिवसभर महिला दिनाच्या कार्यक्रमाची वर्दळ सर्वत्र पाहायला मिळाली, दिवसभर जिल्हा परिषदमधील महिलाच गौरव करण्यात दंग असलेल्या सीईओ वर्षा ठाकूर यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेला महिला दिन औरच ठरला.जिल्ह्यातील प्रमुख उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीईओ वर्षा ठाकूर यांच्या हस्ते केक कापून महिला दिनाचा समारोप केला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात कार्यालयीन महिलांचा महिला दिनी गौरव केला.तिकडे स्वतः महिला सीईओ असलेल्या वर्षा ठाकूर यांनी प्रमुख या नात्याने अधिकारी महिला कर्मचाऱ्यासोबत महिला दिन साजरा केला. प्रत्येक विभागात जाऊन महिला फुल देत स्वागत केले.विशेष म्हणजे ठाकूर यांनी स्वतः महिलांसोबत सेल्फी काढत जिव्हाळा निर्माण केला.

सर्व क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्य व कर्तृत्वातून स्त्री-पुरुष समानतेल आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. यातून काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या दालनात जिल्हा पातळीवरील प्रमुख सर्व अधिकारी यात नांदेड विभागाचे महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक शेवाळे,महापालिका आयुक्त डॉ.लहाने, वैधकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.देशमुख,डॉ.शरद कुलकर्णी, डीएचओ डॉ.बालाजी शिंदे, सीएस डॉ.निळकंठ भोसीकर यांची यावेळी उपस्थिती होती.

याविषयी बोलताना वर्षा ठाकूर भावुक झाल्या, केक कापून किंवा माझा सत्कार इतक्या पुरता मर्यादित हा महिला दिन माझ्यासाठी नव्हता सोबतच्या पुरुष सहकारी अधिकारी यांनी मला अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोतसाहित तर केलेच शिवाय अधिक सक्षम बनविले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago