नांदेड

सिईओ करणवाल ‘लाडक्या बहिणीं ‘च्या मदतीला शेतशिवारापर्यंत

नांदेड,बातमी24: एखाद्या योजनेसाठी लोकांशी थेट जनसंपर्क ठेवणे, रोज येणाऱ्या अडचणीवर मात करणे, त्यातून अधिक सुलभ अधिक सहज सोपी योजना व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयोग नांदेड जिल्ह्यात होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( सिईओ ) मीनल करणवाल या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दररोज थेट लाभार्थी भगिनींशी जिल्हाभर संपर्क साधत आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जिल्ह्यामध्ये पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची यासंदर्भात दररोज महिला व बालविकास विभाग व अन्य सर्व संबंधित विभागासोबत सकाळी साडेदहाला बैठक होते. आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचा जिल्हाभर प्रवास सुरू होतो. कधी थेट शिवारात तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, प्रत्यक्ष कॅम्पला भेटी देऊन, प्रत्यक्ष लाभार्थ्यांची चर्चा करून, सिईओ मॅडम ही योजना सामान्य लाभार्थ्यांना समजावून सांगत आहे. त्यानंतर रोज सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आढावा बैठक घेतली जात आहे.

दर महिन्याला दीड हजार रुपये आणि वर्षाला 18 हजार रुपये देणारी ही योजना राज्य शासनाने नुकतीच सुरू केली आहे. या योजनेचा ग्रामीण व शहरी भागावर मोठा प्रभाव दिसून येत आहे. महिला मोठ्या संख्येने या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमविण्याच्या मागे लागल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा ही त्यांना यासाठी साथ देत आहेत. मात्र काही ठिकाणी काही अडचणी तयार होतात. काही ठिकाणी अशिक्षित महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अडवणूक केली जात आहे. मात्र या सगळ्या बाबी रोज जनतेमध्ये जाऊन त्या त्या फीडबॅकचा दुसऱ्या दिवशी बैठकीत चर्चेला आणून ही योजना अधिक सुलभ अधिक सुकर व्हावी यासाठी ही धडपड लक्षवेधी आहे.

आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. कासारखेडा ता. नांदेड येथील ग्रामपंचायतीस भेट दिली, अडचणी जाणून घेतल्या. एवढेच नव्हे तर कर्मचारी आणि महिलांना फॉर्म भरण्यास मदत ही केली.

बुधवारी १० जुलैला देलगुर तालुक्यात त्यांनी तालुका दौऱ्यादरम्यान खुशावाडी येथील शेताच्या बांधावर जाऊन तेथील शेतकरी महिलांशी चर्चा केली. शेतात काम करणाऱ्या महिलांनी शेतीवाडीच्या ऐन पेरणीच्या लगबगीमध्ये या योजनेकडे दुर्लक्ष करू नये म्हणून त्यांनी माहिती जाणून घेतली. प्रत्येक कामकरी महिलेला याचा लाभ भेटला पाहिजे अशा सूचना त्यांनी नंतर जिल्हा परिषदेच्या संपूर्ण यंत्रणेला केल्या आहेत.

आज १२ जुलैला येरगी देगलूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात शिबिर लावण्यात आले होते. 100 महिलांसमवेत त्यांनी यावेळी संपर्क साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय मांजरम नायगाव येथील सुरू असलेल्या शिबिराला भेट दिली.जास्तीत जास्त लाभार्थींचे फॉर्म भरण्यात यावे, याकरिता ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना आवाहन केले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

3 weeks ago