नांदेड,बातमी24:- कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हर घर दस्तक मोहीम राबविण्यात येत असून आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी किनवट तालुक्यात दौरा केला. तालुक्यातील घोगदरवाडी अंतर्गत शिवशक्ती नगर या आदिवासी पाड्यावर त्यांनी रात्री सात वाजता भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. सीईओ ठाकूर यांनी लसीकरणा संदर्भात गावक-यांचे प्रबोधन केले. त्यानंतर नागरिक लसीकरणासाठी स्वतः होऊन पुढे आले. त्यामुळे शिवशक्ती नगर येथील 100% लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी वाढली पाहिजे,यासाठी हर घर दस्तक हे अभियान प्रशासनाच्या वतीने राबविले जात आहे.या मोहिमे अंतर्गत आदिवासी भाग असलेल्या किनवट तालुक्यातील नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे,यासाठी प्रशासनाकडून वाडी तांड्या पिंजून काढल्या जात आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या आदिवासी भागाच्या वाडी- तांड्यावर पोहचल्या. काही गावातील पाडावर जाऊन त्यांनी आदिवासी महिला व बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाचे महत्व पटवून देत,गावकऱ्यांचे प्रबोधन केले,त्यामुळे शक्ती नगर येथे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले.
जलधारा, बोधडी व किनवट पंचायत समिती येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लसीकरणा संदर्भात आढावा घेतला. यावेळी तहसीलदार मृणाल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षण अधिकारी अनिल महामुने आदींची उपस्थिती होती.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…