नांदेड

सीईओ वर्षा ठाकूर कोरोना बाधित: निवासस्थानातून कामकाज चालविणार:-ठाकूर

 

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या अखेर कोरोना बाधित झाल्या आहेत.शुक्रवारी त्यांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.अहवाल पॉझिटिव्ह आला असला,तरी शासकीय निवासस्थानातून कामकाज चालविले जाईल, अशी माहिती वर्षा ठाकूर यांनी दिली.

नांदेड जिल्हा परिषदमधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, सीईओ यांचे स्वीय सहाय्यक अभय नलावडे यांचा अहवाल काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित आला आहे.

वरील अधिकारी व एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला असल्याने दोन दिवसांपूर्वी वर्षा ठाकूर यांनी अँटीजन चाचणी केली, असता अहवाल निगेटिव्ह आला होता.त्यानंतर गुरुवार दि.18 रोजी वर्षा ठाकूर यांनी आरटीपीसीआर चाचणी केली,असता शुक्रवार दि.19 रोजी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

मागच्या वर्षेभरापासून कोरोना योद्धा म्हणून फिल्डवर काम करणाऱ्या वर्षा ठाकूर यांना अखेर कोरोनाच्या संसर्गाने गाठलेच.चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी सिटीस्कॅन केला,असता संसर्ग नियंत्रणात असल्याचे समोर आले.त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे वर्षा ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी कळविले,मात्र सीईओ कार्यालयाच्या कामकाजात कुठे ही खंड पडू दिला जाणार नाही,कोरोनाच्या नियमांचे पालन तसेच सर्वोत्तपरी काळजी घेत घरून कामकाज चालविले जाणार असल्याचे वर्षा ठाकूर यांनी सांगितले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago