नांदेड

कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्‍म नियोजन करण्‍याचे सिईओ वर्षा ठाकूर यांचे निर्देश

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्‍या दुस-या लाटेत रुग्‍णांची संख्‍या रोखण्‍यासाठी ग्रामीण भागात सूक्ष्‍म नियोजन करण्‍याच्‍या सूचना नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्‍या आहेत. आज शुक्रवार दिनांक 7 मे जिल्‍ह्यातील सर्व तालुका आरोग्‍य अधिकारी व वैद्यकिय अधिका-यांचा सर्वंकष आढावा त्‍यांनी घेतला. यावेळी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागात मागच्‍या वर्षीपासून आयसीडीएस व आरोग्‍य विभागातील कर्मचारी यांच्‍या मार्फत कोरोना प्रतिबंधासाठी गावस्‍तरावर गृहभेटी करण्‍यात येत आहेत. यात सातत्‍य ठेवून मोठया प्रमाणावर जनजागृती करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. गृह विलगीकरणात असणा-या रुग्‍णांची माहिती दररोज शिक्षकांनी घ्‍यावी. तसेच तालुकास्तरावर कंट्रोलरुमची स्‍थापना करण्‍यात आली असून या कक्षातील अधिकारी, कर्मचा-यांनी गृहविलगीकरणात असलेल्‍या रुग्‍णांची माहिती अद्यावत करावी. ग्रामीण भागात कोरोना रुग्‍णांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांनी कमी झाले असून पॉझिटिव्‍ह होण्‍याचे प्रमाणही 30 वरुन 20 टक्‍केवर आले आहे. असे असले तरी मोठया प्रमाणात टेस्‍टींग वाढवण्‍याच्‍या सूचनाही त्‍यांनी यावेळी दिल्‍या. नांदेड जिल्‍हयात दहा व त्‍यापेक्षा जास्‍त रुग्‍ण संख्‍या असलेली 258 गावे होती. या गावांमधून रुग्‍ण संख्‍या नियंत्रणात आली आहे. आता केवळ 46 गावे हॉटस्पॉटमध्‍ये आहेत. जी गावे कंटेंटमेंट झोन म्‍हणून घोषीत केली अशा गावांमध्‍ये तलाठी, ग्रामसेवक व आरोग्‍य यंत्रणेने समन्‍वय ठेवून वेळोवेळी माहिती घेवून योग्‍य ती खबरदारी घेण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.
चौकट
18 ते 44 वर्षावरील व्‍यक्‍तींचे लसीकरण
दिनांक 1 मे पासून वय वर्ष 18 ते 44 वयोगटातील व्‍यक्‍तींचे कोवीड लसीकरण करण्‍याच्‍या सूचना राज्‍य शासनाच्‍या आहेत. त्‍यानुसार जिल्‍हयात मोहिम सुरु करण्‍यात आली आहे. पूर्वी 5 ठिकाणी केंद्र होती परंतू ती वाढवून आता 11 लसीकरण केंद्रांची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या वयोगटासाठी www.cowin.gov.in या संकेतस्‍थळवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. नोंदणी झालेल्‍या लाभार्थ्‍यांनाच लस देण्‍यात येणार आहे. तरी नागरीकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता. नोंदणी करुनच दिलेल्‍या वेळेत आपण निवडलेल्‍या केंद्रावर डोस घ्‍यावा व जावून लस घेण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.
चौकट
त्रिसुत्रीचा वापर करा
कोरोनाच्‍या प्रतिबंधासाठी नागरीकांनी शासनाने दिलेल्‍या नियमांचे तंतोतंत पालन करावे. नियमित माक्‍सचा वापर, सामाजिक अंतर पाळणे व नियमित हात धुणे या त्रिसुत्रीचा वापर करावा. कोरोना प्रतिबंधासाठी येत्‍या 15 मे पर्यंत जिल्‍हयात लॉकडाऊन असून नागरीकांनी आवश्‍यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago