जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्त्यावर टेबलवर दबा धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी देत अशा कर्मचाऱ्यांना चांगलाच हिसका दाखविल्याने बोलले जात असून या कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापनेच्या जागी रुजू व्हावे लागणार आहे.या संबंधीचे आदेश ठाकूर यांनी दि.6 जानेवारी रोजी काढले.
यासंबंधी काढलेल्या आदेश म्हंटले आहे, की मागील दोन वर्षांपासून कोविड-19 प्रादुर्भाव तसेच अशा परिस्थितीत शासनाच्या आदेशानुसार कर्मचारी उपस्थित प्रमाण वेळोवेळी कमी करण्यात आले.याचसोबत जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचारी रिक्त पदे पाहता शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कल्याणकारी म्हणजे महत्वकांक्षी योजना सुरळीत चालविण्याच्या उद्देशाने खाते प्रमुख व गटविकास अधिकारी स्तरावरून सेवा वर्ग/सेवा उपलब्ध तसेच अतिरिक्त कारभार देऊन कामकाज सुरळीतपणे केल्याची बाबसमोर आली असल्याचे सीईओ ठाकूर यांनी त्यांच्या आदेशात विशेषतः नमूद केले.
प्रतिनियुक्ती देत असताना खाते प्रमुख व गट विकास अधिकारी यांनी सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली गेली नसल्याची बाबसमोर आली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय,यांच्या मान्यतेनुसार,मुदत संपलेले व खाते प्रमुख व गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
त्यानुसार प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ पदस्थापनेवर जाण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश ठाकूर यांनी दिले. यासंबंधीचा अहवाल दि.7 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सामान्य प्रशासन विभागास देणे क्रमप्राप्त ठरणार आहे. प्रतिनियुक्तीबाबत फार आवश्यकता आसल्यास सक्षम प्राधिकारी यांची मंजुरी घेऊनच प्रतिनियुक्ती/सेवा वर्ग/अतिरिक्त कारभार विषयक प्रस्ताव सादर केला जावा,परस्पर असे आदेश दिले गेले तर खाते प्रमुख व गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वर्षा ठाकूर यांनी दिला.त्यामुळे प्रतिनियुक्त्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना खुर्च्या खाली करून मूळ पदस्थाना ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…