नांदेड,बातमी24:- देशात कोरोनाचा नवीन धोकादायक व्हेरियंट ओमायक्रॉनचे संकट निर्माण झाल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या संकटापासून बचाव करण्यासाठी 100 टक्के लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेवून हे काम 100 टक्के पूर्ण केले जाणार आहे. ग्रामीण भागातून कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेणा-यांची आकडेवारी 70 टक्क्यांवर गेली आहे. तर दुसरा डोस 26 टक्के नागरिकांनी घेतला आहे. लसीकरणाच्या शंभर टक्के उदिष्ट पूर्ततेसाठी आरोग्य विभागाच्या यंत्रणेसह विविध विभाग सहभागी झाले असून सर्व यंत्रणांनी युध्दपातळीवर लसीकरण करुन घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले.
कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा परिषदेने धडक मोहिम हाती घेतली असून क्षेत्र पातळीवर सुरु असलेल्या कंधार, मुखेड, किनवट, माहूर व किनवट तालुक्यातील गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समितीचे अधिका-यांची आज मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला. त्या म्हणाल्या, आदिवासी प्रभाग असलेल्या माहूर-किनवट मध्ये या कामांना अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. सर्व गट विकास अधिकारी, गट शिक्षणधिकारी, विस्तार अधिकारी आदींनी प्रत्यक्ष कार्यक्षात हजर जाहून दरारोज या कामाच्या अपडेट माहितीचे सादरीकरण करावयाचे आहे. जिल्हयात लसीकरणासाठी त्रिसुत्रीचा कार्यक्रम राविण्यात येणार असून पहिल्यास्तरावर सर्व शासकिय, निमशासकिय यंत्रणा, स्थानिक संस्था, बचत गट, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. दुस-या स्तरावर हर घर दस्तक अभियानातंर्गत अशा व अंगवणवाडी कार्यकर्ती गृहभेटीतून लसीचा पहिला डोस झाला नाही अशा नागरिकांची यादी तसार करणार आहेत तर तिस-या स्तरावर दुसरा डोस देत असलेल्या लाभार्थ्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर कॉल सेंटर उभारण्यात येणार आहेत.
लसीकरणासाठी सरपंच यातील महत्त्वाचा दुवा ठरणार असून तालुकास्तरावर सरपंचांच्या बैठका घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गावातील ज्या व्यक्ती बाहेर गावी स्थलांतरित आहेत त्यांचे लसीकरण झाले आहे का? याची खात्री करावी. जर त्यांनी लस घेतली नसेल तर त्यांना लस घेण्याबाबत निर्देशीत करावे. कृषी अधिकारी, पंचायत समितीचे पर्यवेक्षकीय अधिकारी, ग्रामसेवक, अशा वर्कर या सर्वांनीच लसीकरणामध्ये पुढकार घ्यावयाचा आहे. जिल्हयातील ग्रामीण भागात 13 लाख वीस हजार 733 नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे तर 4 लाख 84 हजार 877 जणांनी दूसरा डोस घेतला आहे.
यापूर्वी दोन वेळा 75 तासाचे लसीकरण मोहिम जिल्हयात राबविण्यात आली. लसीकरणासाठी गावाकडे चला हा उपक्रमही घेण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या मूळ गावी जाऊन गावातील लसीकरण वाढवण्यासाठी उपक्रम घेण्यात आला. हर घर दस्तक या मोहिमेत गृहभेटीतून जनजागृती करुन नागरिकांना लस दिल्या जात आहे. तालुकास्तरावरील आरोग्य यंत्रणेसह सर्व विभाग प्रमुखांनी पुढाकार घेवून लसीकरणाची मोहित यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले
नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे:-डीएचओ डॉ.शिंदे
कोरोनाचा तिसरा विषाणूला रोखायचे असेल तर लसीकरण त्यातील एकमेव उपाय असून ज्याचा पहिला किंवा दुसरा डोस शिल्लक राहिला आहे, अशा 18 वर्षावरील नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे,त्याचसोबत त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी सांगितले.
चौकट
पहिला डोस पूर्ण झालेले 197 गावे
नांदेड जिल्हयातील ग्रामीण भागातील 197 गावांचे कोरोनाचा पहिला डोस पूर्ण करण्यात आला आहे. यात अर्धापूर तालुक्यातील 16 गावे भोकर-18, बिलोली-7, धर्माबाद-4, देगलूर-2, हदगाव-8, हिमायतनगर-6, कंधार-8, किनवट-14, लोहा-3, माहूर-4,मुदखेड-17, मुखेड- 54, नायगाव- 26, नांदेड-8 व उमरी तालुक्यातील 2 गावांचा समावेश आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…