नांदेड

सीईओ वर्षा ठाकूर यांच्या पुढाकारामुळे सौंदर्यात भर

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासात महिला सीईओ होण्याचा मान दुसरा बहुमान सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांना मिळाला आहे. सुंदर माझे कार्यालय या उपक्रमात पुढाकर घेत जिल्हा परिषदमधील सर्व विभागासह सोळा पंचायत समिती कार्यालयाचे रुपडे बदलून टाकले आहे. माझे कार्यालय सुंदर कार्यालय अंतर्गत कार्यालय परिसर व कार्यालयामधील नीटनेटकेपणामुले कार्यालयाच्या सुंदरतेत भर पडली आहे.
सनदी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखासह कर्मचारी यांना कडक शिस्तीचे पाठ गिरवायला भाग पाडले,वेळेचे बंधन अनिवार्य केले असताना संचिका सुद्धा मुदतीत निकाली काढण्याचा कटाक्ष सर्वांना घालून दिला आहे.
माझे कार्यालय सुंदर कार्यालय या उपक्रमाच्या माध्यमातून सीईओ कार्यालयास निसर्ग सौदर्य असलेली रंगरंगोटी केली.इतर सर्व   विभाग यात आरोग्य विभाग काम चांगले झाले आहे.महिला व बालकल्याणची स्वतंत्र इमारत आहे,या इमारतीच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत.कृषी विभाग ही कात टाकत आहे.
नांदेड जिल्हा परिषदसह जिल्ह्यातील सोळा पंचायत समिती कार्यालय व त्या अंतर्गत येणारे विभाग सुध्दा सजावटीने चांगले दिसू लागले आहेत.यात सुरुवातीला झाड कुंडी,येणाऱ्याचे स्वागत करते,असे चित्र दर्शवून जाते, भीतीवरील रंगरंगोटी संवाद साधत असतात.त्यामुळे अधिकारी व कर्मचारी प्रसन्न वातावरण काम करत असल्याचे बघायला मिळत आहे.सुंदर कार्यालय तयार झाली आहेत,यापुढील काळात गतिमान कारभारास गती देण्यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्नशील राहिले पाहिजे, तशा सूचना अधिकारी यांना दिल्या जात असून यात बराच सुधार झाल्याचे  वर्षा ठाकूर यांनी सांगितले
जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago