नांदेड

जिल्हाधिकारी अभिजित राऊत प्रशासनातील पारदर्शक चेहरा

नांदेड जिल्हाधिकारी म्हणून दीड वर्षांपूर्वी जळगाव येथून बदलीने आलेले अभिजित राऊत सर यांना पहिल्या दिवसापासून पाहत आलो आहे.मी आणि माझे काम हेच ब्रीद हेच त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य राहिले आहे.

प्रचंड संयमी माणूस,कमी बोलणं अगदी मितभाषी आणि इतरांचे प्रश्न अधिक समजून घेणं, इतकंच नव्हे तर ते प्रश्न खालपर्यंत कसे मार्गी लागतील,याची पाठपुरावा करण्याची पद्धती असे अनेक गोष्टी आणि उदाहरणे राऊत सर यांच्या बदल सांगता येथील.मी बोलणार कमी पण:काम अधिक करणार हा त्यांचा महत्वाचा गुण म्हणजे कामाचा घालून दिलेला वस्तुपाठ होय.एक सनदी अधिकारी कसा असावा वस्तुपाठ हे अभिजित राऊत सर यांच्या स्वभाव पाहता सहजपणे समजून येते.

अभिजित राऊत सर हे आपल्या पदाची गनिमा राखण्याला सर्वोच्च प्राधान्य देणारे जिल्हाधिकारी आहेत. आपल पद हे सेवा देणारे असून या पदावर राहून लोकांची सेवा केली पाहिजे,त्यांचे प्रश्न निकाली काढली पाहिजे, आणि हे करत असताना जिल्ह्याच्या विकासात अधिक योगदान कसे देता येईल हा ध्यास ते बाळगून असतात.

जिल्हाधिकारी म्हणून काम करताना लोकप्रतिनिधी सोबत ते कायम समतोल व संवादी असतात.कुठेही पदाचा अहभाव न बाळगणे,त्यांच्या दृष्टीने कोण कोणत्या पक्षाचा आहे,हे महत्वाचं नसून लोकांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून ज्यांना सेवा करायला पाठविले,त्यांचा बहुमान राखला पाहिजे, हा कायम त्यांचा कटाक्ष असतो,त्यामुळे कोण्याही लोकप्रतिनिधी सोबत खटका खटकी उडाली असे कधी दिसून आले नाही.

आपल्यासोबत काम करणारी राजपत्रित अधिकारी मंडळी सोबत ही संवाद सहृदयी राहिलेला आहे. कामाशी काम करणे व ते काम करून घेणे ,कुणाला त्रास न देणे व कुणी चुकला तर गय ही न करणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. काम नियमात बसेल तेच करणार आणि न होणारे असेल,त्यात कुणी दबाव टाकू म्हणले,तर कुणाच्या दबावाला न घाबरणे किंवा त्यास भीक घालणे, नियमात नसेल तर काम न होणे नक्की असते,ते त्यांच्या स्वभावात बसूच शकत नाही. पण एक नक्की सरळ मार्गाने लोकांची कामे करणे,त्यांना मदत होईल इतकी काळजी ते घेतात.हा त्यांचा गुणधर्म असून आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन उगी जनसंपर्क वाढविण्यात ही त्यांना कधी रस वाटला नाही.

एक सनदी अधिकारी कसा असावा असे मला कुणी विचारले तर नक्की आणि होय अभिजित राऊत सर सारखा असावा,हा विश्वास व खात्री वाटते, याचे कारण त्यांचं जिल्हाधिकारी पद हे काम हे माझ्यासाठी नसून जनतेसाठी आहे,ही खूणगाठ बाळगून असणारा अधिकारी म्हणून अभिजित राऊत सर कडे पाहिले जाते,जिल्हा प्रशासनाचा मानवी चेहरा अशी त्यांनी नांदेड जिल्ह्याला स्वतःची ओळख करून दिली आहे. प्रशासनातील मोठं नाव अभिजित राऊत सर हे भविष्यात असतील यात शंका नाही,अशी मी आशा बाळगतो
सरांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो,त्यांना निरोगी,आरोग्यदायी आयुष्य लाभो 💐💐💐

जयपाल वाघमारे नांदेड

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago