जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी विशेष:- सलग तीन दिवस झालेल्या तुफान पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते, तब्बल 80 गावांचा संपर्क तुटला,अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरले, नांदेड शहरातील दुर्बल भागातील अनेक घरात पाणी शिरल्याने उडलेलली त्रेधातीरपट, यात जिथे-जिथे आवश्यकता पडेल तिथे महसूल, जिल्हा परिषद टीम तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर असल्याचे बघायला मिळाले.या आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,सीईओ वर्षा ठाकूर असो किंवा मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी कागदी आदेशावर घोडे न नाचविता सर्वत्र फिरून आढावा तसेच अनेक ठिकाणी जाऊन मदत कार्याला हातभर लावल्याचे दिलासादायक चित्र जिल्ह्यातील लोकांना बघायला मिळाले,नांदेड जिल्हाधिकारी डॉ.इटनकर हे कोणते संकट असो,यंत्रणा घेऊन उभे राहण्याची प्रमाणित वृत्ती जिल्ह्याने अडीच वर्षाच्या काळात अनेक वेळा अनुभवली आहे.
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मनपाने अनेक भागात तात्पुरत्या 50 निवारा केंद्र उभारले होते.खडकपुरा,श्रावस्ती नगर,हमलपुरा भागात पूरपरिस्थिती उद्भवली होती,याभागात जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी करून बचाव व मदतकार्यास गती दिली,
जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका इसमाची सुटका करण्यासाठी ते स्वतः एनडीआर एफ टीम घेऊन तिथे गेले. तासा-तासाची माहिती घेत,ते उपाययोजनांवर लक्ष ठेवून होते.
जिल्ह्याला पावसाचा धोका निर्माण होणार हा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता,तेव्हाच जिल्हा परिषदच्या जिल्हाभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेडकोर्टर न सोडण्याचे आदेश दिले,आवश्यकता आहे,अशा नदी काठच्या ठिकाणी आरोग्य, लघु पाटबंधारे विभागास सतर्क राहण्याचे आदेश दिले.त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काय परिस्थिती होतेय,याबद्दल माहिती घेऊन मदत कार्याबाबत सूचना दिल्या,त्याचसोबत प्रत्येक ठिकाणी घडलं असलेल्या माहितीचे संकलन व्हावे,यासाठी मीडिया हाऊसप्रमाणे जलद माहिती देण्याची सोय केली.
नांदेड शहराच्या अनेक भागात घरात पाणी साचल्याने अशा भागातील लोकांना सुरक्षित स्थळी कसे हलविता येते,यासाठी स्वतः अनेक भागांना भेटी देत राहिले,अनेक ठिकाणी मनपाने निवारा केंद्र उभे करून आपत्तीत अडकलेल्या लोकांना जेवणा व राहण्याची सोय करत कर्तव्य बजावत,नांदेडकराना मोठा आधार दिला. मागच्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी डॉ.इटनकर,सीईओ वर्षा ठाकूर व मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सूक्ष्मनियोजन केल्याने आपत्तीतही मदत कार्य मिळाल्याची भावना व्यक्त झाल्याचे बघायला मिळाले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…